- अन्यथा त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- बदलापूर येथील घटनेनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. तसे आदेश राज्य शासनाने काढले असून, त्याची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.
सर्वच खासगी व महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे. चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शहरातील बहुतांश खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच महापालिकेच्या शाळांमध्येदेखील सीसीटीव्ही आहेत. मात्र, काही शाळांतील कॅमेरे बंद आहेत.
पालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही असून, ते कार्यरत आहेत. शहरातील खासगी शाळांमध्ये कॅमेरे बसविण्याबाबत शाळांना आदेश दिले आहेत. खासगी शाळांची तपासणी करण्यात येणार असून, ज्या शाळांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही, त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. – संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, पिं. चि. महापालिका…












