न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२४) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये (दि. २) रोजी लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. संस्थेतील मुलांनी संपूर्ण शाळेतील कचरा एका जागी जमा केला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या अभियानासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आणि संस्थेचा परिसर स्वच्छ केला.
संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष संदीप काटे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे विचार किती थोर होते हे उदाहरणासहित विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून पर्यावरणाची काळजी घ्या, असं आवाहन करीत संस्थेतील मुलांना एक जबाबदार भारतीय नागरिक बनविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याबाबत मत व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या प्राचार्या सुविधा महाले, मयूर काळे, श्वेताकांत, नेहा सपकाळ, सोनल पाटील, कुलदीप तैफ, सुरभी मिश्रा, शीतल पाटील, सुनिता मुजेकर, मनीषा तनपुरे प्रिया चाळके आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.












