न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२४) :- तिघांनी मंत्रालयामध्ये ओळख असल्याचे महिलेला भासवले. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी झाल्याने तेथील इतरांच्या नावे असलेले वाईनशॉप लायसन ट्रान्सफर करून देण्याच्या बहाण्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांना न वटनारे चेक देवन महिलेची ४०,००,०००/- रूपयांची फसवणुक केली आहे. तसेच याबदल्यात त्यांच्या नावे असलेल्या सातारा येथील फ्लॅटची खोटी विसारपावती लिहुन दिली. अद्याप महिलेला लायसन देखील दिले नाही तसेच पैसे देखील परत केले नाही, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार १ सप्टेबर २०१९ ते ०६/१०/२०२४ पर्यंत तळेगाव दाभाडे येथे घडला. ५६ वर्षीय महिलेने आरोपी ०१) विनायक शंकर रामगुडे, ०२) महिला आरोपी, ०३) पराग शंकर रामगुडे या तिघांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी तिघांच्या विरोधात ४२२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८ (४),३१६ (२),३ (५) गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि वारे पुढील तपास करीत आहेत.












