न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२४) :- मोबाईलचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन तिघांनी लोखंडी कडयाने तिघांना मारहाण केली. तसेच २८ वर्षीय तरुणाच्या पाठीत लोखंडी चाकु भोकसुन त्याला ठार मारले. दरम्यान आरोपींनी शिव्या देवून ‘आमचे नादी लागला आणि पोलीसात तक्रार केली तर तुम्हाला पण ठार मारतो’ अशी धमकी दिली. थोडया वेळाने तिघंजण काळया रंगाच्या बुलेटवर बसुन कोठेतरी निघुन गेले, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०७) रोजी रात्री ११.०० वा. सुमारास भोसरी येथे सार्वजनिक रोडवर घडला. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने आरोपी १) रमेश कांबळे, रा. के/ऑफ कांबळे यांची खोली सर्व्हे नं. २०५/२, महादेव नगर कॉ. क्र. ०२, भोसरी पुणे (पुर्ण नाव माहिती नाही.) २) देवा कांबळे सदया रा. के/ऑफ कांबळे यांची खोली सर्व्हे नं. २०५/२, महादेव नगर कॉ. क्र. ०२, भोसरी पुणे (पुर्ण नाव माहिती नाही.) ३) एक अनोळखी इसम (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही.) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी तिघांवर ४३०/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३,११८(१), ११५ (२), ३५२,३५१(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नितीन अंभोरे सहा पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.












