- ‘आमची मुलगी कुठे आहे’, असं म्हणत प्रवासात केलं रात्रभर ‘टॉर्चर’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२४) :- “तु आमच्या मुलीला कोठे ठेवले आहे” असे म्हणून तरुणाला पाचजण घरातुन बळजबरीने रुमच्या खाली घेवुन आले. त्यांनी आणलेली चॉकलेटी रंगाची टाटा टियागो गाडीत तरुणाला बसवले. तसेच रुममधील इतर मुलांना ‘याच्या घरच्यांना कळविले तर याद राखा तुम्हाला पुण्यात राहु देणार नाही’ अशी धमकी दिली.
गाडीत बसुन तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केली. ‘लोखंडी चाकु तरुणाच्या गळ्याला लावला व तुला आता मारुन इकडेच फेकुन देतो. आमची मुलगी कुठे आहे ते सांग, अशी विचारणा केली. तरुणाच्या अंगावर ते पीत असलेल्या सिगारेटचे चटके दिले. तरुणाला घेवुन जात असताना वाटेत अंगावर थंड पाणी टाकत होते. झोपु नको अशी दमदाटी करत सकाळी ०५.०० वा तरुणाला त्याच्या मुळ गावी राहत्या घरी कडा ता. आष्टी जि.बीड येथे घेवुन गेले व तरुणाच्या वडीलांच्या ताब्यात दिले, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.०६) रोजी रात्री १०.३० वा चे दरम्यान देहुफाटा, आळंदी येथे घडला. फिर्यादी विपुल प्रविण कळसकर (वय २० वर्षे, देहुरोड फाटा आळंदी) याने आरोपी १. अजित शेंडगे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही.), २. बाळासाहेब गायकर (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही.), ३. बाबासाहेब शिरोळे (रा. खेडकर वस्ती कडा ता. आष्टी जि. बीड), ४ शेंडगे सर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही.), ५. प्रविण खेडकर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही.) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी ४२९/२०२४ भा.न्या.सं. कलम १०९,११५ (२),१४० (३),१८९ (२),१९०.१९१(२). १९१(३),३५१ (२),३५२ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो उपनिरीक्षक शंभु रणवरे तपास करीत आहेत.












