न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्र्वादीत फूट पडण्याच्या आधी अजित पवारांना पिंपरी चिंचवडच्या मतदारांचा पाठिंबा होता. चिंचवड विधानसभेतील अनेक निष्ठावंत अजित पवारांसोबत राहिले आहेत. नाना काटे हेदेखील अजित पवारांचे कट्टर समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
अजित पवार हे सध्या महायुतीसोबत असले तरी जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
काटे म्हणाले, चिंचवड विधानसभा लढण्याच्यादृष्टीने मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवा मार्ग निवडणार आहे. अजित पवार यांच्यानंतर शरद पवार साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच, असं म्हणत त्यांनी शरद पवार गटात आचारसंहितेपुर्वी प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. ज्यांना आमदार व्हायचंय ते स्वतंत्र मार्ग निवडत असल्याचे सांगत अजित पवारांनी पक्ष बदलण्यासाठीचे मार्ग खुले केले आहेत. नाना काटेंच्या या निर्णयाने अजित पवारांना चिंचवड विधानसभेत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.