न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ज्येष्ठ नागरीकांच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होणेकामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत ज्येष्ठ नागरिक कक्ष, नियंत्रण कक्ष (डायल ११२), राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन १४५६७ व पोलीस आयुक्त कार्यालय येथे दिलेले तक्रारी अर्ज महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल तसेच शासन व पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज प्राप्त होत असतात. सदर प्राप्त जेष्ठ नागरीकांच्या तक्रारी अर्जाचे तातडीने निराकरण केले जाते.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिकांकडुन आलेले तक्रारी अर्जाची गैरसोय न होता वेळेत त्यांचे निरसण व्हावे म्हणुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचेशी थेट संवाद साधता येतो. तसेच त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होणेकरिता पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे आदेशाने आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे येथे प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी सकाळी १०.३० ते २.०० वा. पर्यंत संबंधीत पोलीस उप-आयुक्त, सहा. पोलीस आयुक्त तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे उपस्थितीत तक्रार निवारण दिन आयोजित केला जातो.
दि.०९/१०/२०२४ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय, निगडी येथे सायं. ४.३० ते 7.३० वा पर्यंत ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळावा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांचे संकल्पनेतुन घेण्यात आला. कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (गुन्हे-२), पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ त्यांचे पदाधिकारी व २५० ते ३०० ज्येष्ठ नागरिक हजर होते.
पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे यांनी ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमास आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत करुन प्रस्तावना केली. पोलीस उपनिरीक्षक दिनकर गावडे, ज्येष्ठ नागरिक कक्ष, यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा व त्यांचे हक्काबाबत पी. पी. टी व्दारे माहिती दिली. तसेच हद्दीमध्ये एकटे-दुकटे राहणारे जेष्ठ नागरिकांना दामिनी पथकामार्फत भेट देवून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जातात. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण (सायबर सेल) यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सायबर फसवणुक टाळता यावी म्हणुन अनोळखी लिंक ओपन करु नयेत तसेच अनोळखी व्यक्तींकडून दुरध्वनीवरुन कोणतीही माहीती विचारली असता ती देवू नये याबाबत पीपीटी व्दारे सादरीकरण करुन माहिती दिली.
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पोलीस प्रशासनाव्दारे ज्येष्ठ नागरिक कक्ष, डायल ११२ पथक, दामिनी पथक, दिशा फाउंडेशन, महिला सहा. कक्ष याव्दारे कशी मदत दिली जाते. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यदायी जिवन जगण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करुन मनोगत व्यक्त केले. सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी आभार प्रदर्शन करुन संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राखीव पोलीस निरीक्षक निगडे यांनी केले.












