न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० मे २०१९) :- बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवरच चांदणी चौकात गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या भावासह तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली आहे.
आकाश लहू तावरे (वय २२), सागर लहू तावरे (वय २४), सागर रामचंद्र पालवे (वय २१, रा. मु. पो. राजे ता. भोर जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तुषार प्रकाश पिसाळ (वय २०, रा. मु. पो. राजेगाव ता. भोर, जि. पुणे) याच्यावर चांदणी चौकात गोळीबार करण्यात आला होता.
तुषार पिसाळ याने आकाश तावरे याच्या बहिणीशी लग्न केले होते. त्याचा राग मनात होता. आकाश तावरे, सागर तावरे, आणि विद्या हिचा चुलता राजू तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी संगनमत करून तुषार पिसाळ याला संपविण्याचा डाव रचला.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी सुनील पवार, शंकर संपते, विशाल शिर्के, शंकर पाटील, रमेश चौधर, निलेश शिवतरे यांच्या पथकाने केली.











