न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले नामफलक तात्काळ काढुन योग्य ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनचालकांच्या व परराज्यातुन येणाऱ्या नागरीकांच्या सोईसाठी सभोतालच्या गावालगत दिशादर्शक नामफलक लावले आहेत. परंतु, सदरील फलक चुकीच्या ठिकाणी लावले आहेत. जसे बालेवाडीकडुन देहुरोडकडे जाताना महामार्गालगत वाकडगावचा दिशादर्शक फलक बालेवाडीकडे लावण्यात आला आहे. तसेच ते नामफलक नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांची दिशाभुल होऊन कुंचबना होत आहे.
येत्या पाच दिवसात सदरील महामार्गालगत गावालगतच्या ठिकाणी लावलेले नामफलक योग्य ठिकाणी व दुरूस्त करून न लावल्यास शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने शिवसेना स्टाईलने तोंडाला काळे फासण्यात येईल, या कामी उद्भभनार्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राही, असे या पत्रात दाखले यांनी म्हटले आहे.











