- उद्योगनगरी चाकण जवळील महाळुंगे येथील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २० ऑक्टोबर २०२४) :- तरुणाच्या बहिणीवर कंपनीत काम करणाऱ्या आरोपीने वाईट नजर ठेवुन तिस मॅसेज केला. त्यावरून तरुण हा आरोपीला ‘तु माझ्या बहिणीला छेडु नको’ असे म्हणाला. त्याचा राग आल्याने फिर्यादी तरुण हा कंपनीतुन कामाची सुट्टी करुन घरी जात असताना आरोपी क्रं १ व त्याच्या दोन मित्रांनी तरुणाला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली.
हातातील कटरच्या ब्लेडने तरुणाच्या पोटावर, मानेवर, पाठीस, खांदयावर सपासप वार करुन त्यास गंभिर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे. हा प्रकार (दि. १८) रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याचे सुमारास महाळुंगे येथील सुप्राजित कंपनीजवळ घडला.
याप्रकरणी अभिषेक ऊर्फ निकी सुरेश विश्वकर्मा (वय २४ वर्ष, रा. महाळुंगे) याने आरोपी १) राजकुमार विश्वकर्मा (रा. निघोजे), २) दोन अनोळखी इसम (वय अंदाजे २२ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ७०४/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०९ ११५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कैलाशकुथे सहा पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.











