न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २० ऑक्टोबर २०२४) :- सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणावरुन गोडुंब्रेच्या सरपंच नीशा गणेश सावंत यांचे सरपंचपद अपात्र ठरवण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील माहितीनुसार, गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असून, त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) अन्वये अपात्र करण्याबाबत कल्पना हेमंत सावंत (रा. गोडुंब्रे) यांनी १० जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दोघांनाही आपले म्हणणे मांडण्यास पुरेसा वेळ देण्यात आला. सावंत यांच्या अर्जात तथ्य आढळल्याने नीशा सावंत यांचे सरपंचपद व सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले.