- दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून मावळातून आमदार सुनील शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मावळमध्ये कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे.
‘मावळ तालुक्यातील माय-बाप जनतेने मला पाच वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. तसेच अजितदादांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असले तरी, आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वजण एकजुटीने महायुती धर्माचे पालन करतील’, असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आ. शेळके यांनी यावेळी दिली आहे.
मावळ मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच गेले होते. गेल्या ५ वर्षांत मावळ मतदार संघात तब्बल ४ हजार १५८ कोटी ३२ लक्ष इतक्या मोठ्या निधीच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत. त्यामुळे मावळ मतदार संघातील जनता शेळके यांना पुन्हा झुकते माप देऊन आमदारकी बहाल करेल?, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
दरम्यान पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही मावळसाठी उमेदवारी मागितली होती. त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशाेधन परिषदेचे उपाध्यक्षपद नाकारले आहे. ते निवडणूक लढविण्यावर ठाम होते. आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.











