न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नवनिर्वाचित शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी अण्णा बनसोडे यांचं काम करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
त्यावर अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, आमच्यात काही अलबेल नाही. राष्ट्रवादी हे मोठं कुटुंब आहे. किरकोळ गोष्टींचा वाद आहे. शहराध्यक्ष योगेश बहल आणि मी या सर्वांना विश्वासात घेऊन जो काही वाद असेल तो मिटवणार आहोत. महायुतीचा उमेदवार म्हणून ते सर्व माझा प्रचार करतील.
त्यानंतर शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, माझा आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध नव्हता किंवा नाराजी नव्हती. आम्ही नाराज इच्छुकांची आणि माजी नगरसेवकांची भेट घेणार आहोत. त्यांची समजूत काढणार आहोत आणि आमदार अण्णा बनसोडे हे विजयी होतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.












