- हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस आयुक्तालयाजवळ आढळले तब्बल तीन बॉम्ब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२४) :- चिंचवडगावातील प्रेमलोक पार्क येथील पाण्याच्या टाकी जवळील असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यात बुधवारी (दि. ३०) रोजी दुपारी १२.३० वाजता तीन बॉम्ब सेल मिळुन आले आहेत. त्यासंदर्भाने बीडीडीएस पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तलाय व बीडीडीएस पथक, पुणे आयुक्तालय यांना घटनेबाबत माहिती देवुन पाचारण करण्यात आले.
तसेच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र, पुणे यांना बोलविण्यात आले. सदरचे बॉम्ब निकामी असल्याची पथकाकडुन खात्री करुन घेण्यात आली. घटनास्थळी पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे परिमंडळ ०१, सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील चिचवड विभाग, वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र कोळी चिंचवड पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.
तिन्ही बॉम्ब सेल याबाबत अधिक चौकशी व तपास चालु असुन सदरचे बॉम्ब हे सुरक्षतेकामी सदन कमान्ड, संरक्षण विभाग, पुणे यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.