न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व कै. नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील काळोखे गोशाळेत वसुबारस पारंपारिक पद्धतीने व थाटामाटात साजरी झाल. संपूर्ण गोशाळेत आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक रांगोळ्यांची सजावट, गाईंना रेशमी झुली, शिंगाना रंग व बेगड, सुंदर घुंगरमाळा व फुलहार घालून गायींना व वासरांना सजवण्यात आले होते.
गोसेवक व्याख्याते दत्तात्रय सदाशिव दातार यांनी भारतीय संस्कृतीमध्ये गाईचे पौराणिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक महत्व विशद करताना अनेक उदाहरणे दिली.
मनीषा काळोखे, मृणाल काळोखे, रो. शरयू देवळे, रो. वर्षा खारगे, अँन्स शारदा कदम, जयश्री काळोखे यांच्या शुभहस्ते गायींचे पूजन करण्यात आले. गाईंना गोडाचा व दिवाळी फराळाचा नैवेद्य देण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले असून सूत्रसंचालन उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी तर, आभार सेक्रेटरी सुरेश दाभाडे यांनी मानले.
क्लब ट्रेनर दिलीप पारेख, माजी अध्यक्ष सुरेश शेंडे, नितीन शहा, संजय मेहता, हरिश्चंद्र गडसिंग,संतोष परदेशी,रामनाथ कलावडे, दशरथ ढमढेरे,विश्वास कदम, रघुनाथ कश्यप, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे,तानाजी मराठे, संजय वाघमारे, राकेश ओसवाल, विनोद राठोड,बसाप्पा भंडारी,रोट्रक्ट अध्यक्ष रोशनी ओसवाल, माजी अध्यक्ष वैभव तनपुरे इ.सह पतसंस्थेचे सचिव विश्वनाथ काळोखे, संचालक जयश्री काळोखे, संजय संदानशिव, डॉ. शाळिग्राम भंडारी, पतसंस्थेचे अधिकारी व सभासद, योगा ग्रुप, गोल्डन ग्रुप, रोटरी सिटीचे, पतसंस्थेचे व काळोखे मित्र परिवारातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.











