- राम कृष्ण हरी वाजवा तुतारी घोषणांनी संत तुकाराम नगर दुमदुमले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.०६ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या रॅलीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात आता बदल अटळ आहे हे उस्फुर्त मतदारांनी दाखवून दिले.
डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आज पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर येथून झाला यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
संत तुकाराम नगर मधील मतदारांनी यावेळी उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे उस्फुर्त स्वागत केले. ही रॅली म्हणजे पिंपरी विधानसभा मतदार संघातील बदलाची नांदी ठरणार अशी प्रतिक्रिया मतदारांनी यावेळी व्यक्त केली.

















