- चिंचवडच्या विकासाकरिता आमदार म्हणून शंकरभाऊंना विधानसभेत पाठवा..
- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चिंचवडकरांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.०६ नोव्हेंबर २०२४) :- ”लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शहराची आगळी वेगळी ओळख निर्माण केली. विकासाच्या वाटचालीमध्ये प्रचंड मोठी भूमिका घेण्याचा सिंहाचा वाटा हा लक्ष्मणभाऊंचा राहिला. अतिशय कमी वयात आणि महत्वाच्या वेळी लक्ष्मणभाऊ आपल्याला सोडून गेले. पण मला या गोष्टींच समाधान आहे की, त्यानंतर अश्विनी वहिनींवर चिंचवडकरांनी विश्वास दाखवला. अश्विनी वहिनींनी देखील कमी वेळामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकरचा काम करून दाखवल. चांगले निर्णय त्यांच्या पाठपुराव्यामुळे आलेले आपल्याला बघायला मिळाले. आता या निवडणुकीमध्ये लक्ष्मणभाऊंचे कार्य पुढे नेण्यासाठी शंकरभाऊंना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी लक्ष्मणभाऊ आणि अश्विनी वहिनींवर आपण विश्वास दाखवला, तसाच विश्वास शंकरभाऊंवर दाखवाल. चिंचवडच्या विकासाकरिता या विकासाचा आमदार म्हणून आपण त्यांना निवडून विधानसभेत पाठवाल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी (दि. ६) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील मैदानात संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुजरातचे माजी गृहमंत्री आ. प्रदीप जडेजा. खा. श्रीरंग बारणे, आ. अश्विनी जगताप, आ. उमा खापरे, आ. अमित गोरखे, उमेदवार शंकर जगताप, नाना काटे, सचिन साठे, अनुप मोरे, विनायक गायकवाड, विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, मी नाना काटे यांचे आभार मानतो. त्यांनी युती धर्माचे पालन केले. मला पुढे संधी मिळेल पण आज मला युतीच सरकार आणायचं आहे. मोठ्या ताकदीने शंकर भाऊ यांच्या पाठीशी उभे राहू, असं म्हणत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि शंकरभाऊना समर्थन दिलं. जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आण्यासाठी युती धर्माच पालन करा, जीवाच रान करा, असा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
पुढे बोलताना म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे देशातील वेगान वाढणार शहर आहे. चिंचवडमध्ये लोकसभेनंतर मतदारांच्या संख्यामध्ये ५० ते ६० हजार मतांच्या संख्येमध्ये मला फरक दिसतोय. म्हणजे किती वेगान शहराची लोकसंख्या वाढतीये. वेगान नागरीकरण होतय. मी मुख्यमंत्री असताना लोकसंख्येचा विचार करत मी आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी आणि आता भामा आसखेडमधून १६० एमएलडी पाणी उपलब्ध करून दिल. पहिलं पाणी पोचलं, दुसऱ्या कामाचं भूमिपूजन झालं. शंकरभाऊ मला सांगत होते, ‘एवढ्या पाण्याने आमच भागणार नाही, आम्हाला अजून पाणी द्यावे लागेल.’ मी तुमच्या साक्षीने सांगतो हे आपलं महायुतीचे सरकार या शहराला पाणी कमी पडून देणार नाही. नागरिकांना जेवढ पाणी लागेल ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये पाणी वेगवेगळ्या धरणातून तुम्हाल देण्याच काम आपल्या सरकारच्या माध्यमातून करू. शेवटी पिंपरी चिंचवड हे वाढत शहर आहे. नागरीकरण या ठिकाणी होतय आणि त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची समस्या हि मोठ्या प्रमाणात आपल्याला दूर करायची आहे.
पुढे बोलताना म्हणाले, अश्विनी वहिनी यांनी सातत्याने पुनावळे कचरा डेपोच्या संदर्भात विषय मांडला. त्या संदर्भातले सगळे निर्णय आपण घेतलेत. या ठिकाणी डेपो बंद करून केपिंग करून चांगल्या प्रकारे लोकांना कचऱ्याच्या समस्येतून मुक्ती द्यायची आहे. हा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे. येत्या काळामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मैदान, गार्डन आणि इतर उपयोग हे होताना आपल्याला पहायला मिळतील. खर म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील सगळ्यात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे. मागच्या काळामध्ये शिवाजीनगर पासून हिंजवडीपर्यंत आपण मेट्रोच काम सुरु केलं. मोठ्या प्रमाणात मेट्रो, पीएमपीएमलच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा उपलब्ध करून देता येईल, हा प्रयत्न सुरु केला. आज मेट्रोच जाळ आपण विनतोच आहे पण आज सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची ‘कि’ संपूर्ण देशात आपल्या पीएमपीएमलकडे आहे. ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परिणामकारक सोल्युशन आपण करतोय. पुणे शहराला सगळ्यात जास्त आवश्यकता ही पुणे रिंग रोडची होती. रिंग रोड झाल्याशिवाय ती आटोक्यात येऊ शकत नाही, हे आम्ही लक्षात घेतल आणि वीस हजार कोटींचा रिंग रोड पुण्याला मजूर करून त्याच टेंडर केल. येत्या काळात त्याच काम सुरु करतोय. सगळ्यात जास्त रिंग रोडचा फायदा या पिंपरी चिंचवड शहराला होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या दूर होणार आहे.
पुढे बोलताना म्हणाले, अलीकडच्या काळात ‘फेक नरेटिव्ह फॅक्टरी’ सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवारसाहेब हे देखील त्या ‘फेक नरेटिव्ह फॅक्टरी’चे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. पवार साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. अलीकडच्या काळात ते रोज सांगतात. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले. राज्यात उद्योग येत नाहीयेत. औद्योगिकीकरण होत नाही. खऱ्या अर्थाने मी आपणाला सांगू इच्छितो पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग, आमचा सगळा हा पुणे जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. आमच मेंयुफेक्च्रिंग हब आहे, आयटी हब आहे. आम्ही याला आता टेक्नोलोजी हबमध्ये परिवर्तीत केलेलं आहे. देशात जेवढी गुंतवणूक , फडीआय आला. या सगळ्या गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. हे मी नाही तर नीती आयोग आणि आरबीआयचा रिपोर्ट सांगतो. २०१४ ते २०१९ पूर्ण पाच वर्षे महाराष्ट्राला आम्ही गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवले.

















