न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 18 नोव्हेंबर 2024) :- कुदळवाडीमधील प्रत्येक व्यावसायीक सध्या प्रशासकीय व पोलिस प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे भयभयीत व संकटात सापडला आहे.

भोसरीतील एकही राजकारणी या वर्गा सोबत प्रामाणिकपणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येत नाही. यामुळे येथील व्यावसायिकांनी माझ्या ‘हिरा’ या चिन्हा समोरिल बटना दाबून आपल्या समस्या निर्भिडपणे सोडविण्यासाठी मला मतदान करावे, असे आवहान जावेद शहा यांनी कुदळवाडी येथील प्रचार फेरी दरम्यान येथील व्यावसायिकांना केले.
स्वराज्य शक्ति सेनेचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार जावेद शहा यांनी आदर्शनगर, जाधववाडी, कुदळवाडी येथे प्रचार फेरी काढत येथील मतदारांशी संवाद साधला. या वेळी अनेक व्यावसायीकांनी सर्वात जास्त त्रास हा येथील काही गुन्हेगारी घटकाकडून होत असून याला महापालिका व पोलिस प्रशासन देखील साथ देत असल्यामुळे येथील व्यावसायीक हे भितीच्या सावाटाखाली वावारत आहेत. हे सर्व कुठेतरी थांबवायचे असेल तर मलाच निवडून द्यावे, असे आवाहन देखील जावेद शहा यांनी केले.
यावेळी अनेक व्यावसायिकांनी त्यांना रोजच येणाऱ्या अडचणीचा पाडा जावेद शहा यांच्या समोर नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितला. तर फक्त मुस्लिम आहेत म्हणून आमच्या आडचणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले.
















