न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 18 नोव्हेंबर 2024) :- रुपीनगर, त्रिवेणीनगर, चिखली परीसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी व सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील समस्यांची जाण असल्यामुळे मतदारांनी मलाच निवडून द्यावे, असे आवाहन भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार खुदबुद्दीन होबळे यांनी रुपीनगर, तळवडे परिसरातील नागरीकांना केले.

सध्या रोजगराच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या व परवडनारे घरे तसेच घराचे भाडे या बरोबरच तळवडे, चाकण, निघोजे या परिसरातील मिळत असलेला रोजगार यामुळे रुपीनगर, त्रिवेणीनगर, चिखली परिसरात कष्टकरी वर्गाची मोठी वसाहत निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने येथील इतरही समस्या बरोबरच वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. पण या समस्याकडे येथील कोणत्याच राजकारणी लोकाचे लक्ष नसल्यामुळे मतदारांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप खुदबुद्दीन होबळे यांनी सत्ताधारी व भोसरीतील इतर प्रमुख पक्षाच्या उमेदवारावर केला आहे.
त्यामुळे नागरीकांनी व मतदारांनी माझ्याच ‘हंडी’ या चिन्हासमोरील बटन दाबून मलाच बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन प्रचारावेळी केले.
खुद्बुद्दीन होबळे यांनी सेक्टर 22, सहयोगनगर, घरकुल वसाहत, त्रिवेणीनगर, चिखली या परिसरातील मतदारांशी गाठी भेटी घेत संवाद साधला.
















