न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीतील प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी पदयात्रा, रॅलींनी प्रचाराची सांगता केली. उद्या बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर लगेचच प्रचाराने जोर धरला नव्हता, मात्र राजकीय पक्षांनी व्यूहरचना सुरू केल्यानंतर हालचाली वाढल्या. उमेदवार जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळमध्ये प्रचाराला जोर आला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने गेले काही दिवस शहरातील सर्वच उमेदवारांनी वातावरण ढवळून काढले होते. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची अंतिम मुदत संपली आणि सगळीकडे बॅनर, पत्रके, फलक उतरताना दिसले. आता दोन दिवस कार्यकर्ते आणि उमेदवारांसाठी अत्यंत धावपळ आणि तणावाचे असतील. बुधवारी मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे.

















