- बुधवारी सकाळी ६ ते सायं ७ वाजेपर्यंत पोलिसांकडून वाहतुकीत बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत काही मतदान केंद्रांवर बूथची संख्या जास्त आहे. मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २०) पार पडणार आहे. मतदान केंद्रांवर जाताना मतदारांना अडथळा होऊ नये, तसेच वाहतूककोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल बुधवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे.
तळवडे वाहतूक विभागाअंतर्गत देहूगाव मुख्य कमान ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ही वाहतूक कंद पाटील चौकमार्गे तसेच अंतर्गत रस्त्याने इच्छितस्थळी जाईल. सांगवी वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद गार्डनब्रीजकडून जी. के. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल समोरून व्हिबग्योर चौकात जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंदी असून ही वाहने लगतच्या पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडवाडी चौक ते मातेरे हाऊस चौक या दरम्यानच्या रोडवर जाणा-या व येणा-या जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही वाहने पांजरपोळ चौक किंवा भारतमाता चौकातून तसेच आरटीओ रोडने इच्छित स्थळी जातील.

















