न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२४) :- नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे व शहर अभियंता शिरिष आरदवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथे कार्यान्वित असलेल्या विविध प्रकल्पांना (दि. २२) रोजी सकाळी ११.०० वा. भेट दिली. भेटीदरम्यान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तसेच हॉटेल वेस्ट टू बायोगॅस व राडारोडा व्यवस्थापन केंद्राच्या तांत्रिक बाबींसह प्रकल्प उभारताना येणाऱ्या आव्हानांबाबत आयुक्त, नवी मुंबई मनपा यांनी इतंभूत माहिती घेतली.
पिंपरी चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या एकुण घनकचऱ्यावर तसेच बांधकाम राडारोड्यावर मनपा मार्फत करणेत येणाऱ्या संकलन व प्रक्रिये बाबत संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी उपस्थितांना सादरीकरणासह विस्तृत माहिती दिली.
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी प्रकल्प यशस्वीरित्या उभारुन कार्यान्वित ठेवलेबाबत पिंपरी चिंचवड मनपाचे अभिनंदन केले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या घनकचऱ्यावर महानगरपालिकेमार्फत करणेत येणाऱ्या शाश्वत व पर्यावरणपुरक प्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती घेतली, त्यानुसार सदरचे प्रकल्प पर्यावरणपुरक व स्टेट ऑफ दि आर्ट संकल्पनेवर आधारित असून सर्व आव्हानांचा सामना करुन पूर्ण केले असले बाबत मनपाचे कौतुक केले.
स्थळ पहाणीवेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरिष आरदवाड, कार्यकारी अभियंता राजेश पवार, उप अभियंता जितेंद्र रावळ तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे उप अभियंता योगेश आल्हाट उपस्थित होते.
















