न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. २७ नोव्हेंबर २०२४) :- तळेगावातील जागृत देवस्थान आणि ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात काळभैरवनाथ जयंतीनिमित्ताने जन्मोत्सव सोहळा व हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. ‘श्री’ च्या छबिना आणि पालखीने सोहळयाची सांगता झाली.
श्री डोळसनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने विश्वस्त राजेश सरोदे, उत्सव समिती अध्यक्ष मिथुन काकडे, तालीम मंडळ, भजन मंडळी, भोई समाज व ग्रामस्थांच्या हस्ते ’श्री’ची आरती करण्यात आली. त्यानंतर ग्राम प्रदक्षिणेसाठी ’श्री’ची पालखी काढण्यात आली.
नगारा, संबळ, शिंगाड, शंख, डमरू, टाळ-मृदुंग, दोन सफेद अश्व, विद्युत रोषणाईच्या छत्री, ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात भजन मंडळी, महिला पालखीचे मानकरी, भोई समाज बांधव, भराडी, गोफ्लधळी, ग्राम पुरोहित रेडे, गुरव पुजारी, डोळसनाथ महाराज ट्रस्ट डोळसनाथ उत्सव समिती, श्री डोळसनाथ तालीम मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींची पालखी घेऊन प्रस्थान झाले.
’श्रीं’ची पालखी ग्राम प्रदक्षिणा करून पुन्हा मांदिरात आल्यावर आरती झाली. कै. नामदेव रामभाऊ सरोदे यांच्या स्मरणार्थ राजेश सरोदे व त्यांच्या परिवाराकडून सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.











