न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२४) :- २६/११ रोजी मुंबई येथे दहशवादयांच्या भ्याड हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त (गुन्हे), विवेक पाटील पोलीस उपायुक्त (मुख्यालय), महेश साळवी राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व अमंलदार आदी उपस्थित होते.
तसेच पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन येथे अधिकारी व अमंलदार यांनी २६/११ मधील शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण केली.
















