न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी व मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना नवीन वेळेनुसार कामकाज करावे लागणार आहे.
बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन घेतलेल्या संस्थांच्या कामकाजावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत हा बदल करण्यात आला आहे.
सहाय्यक आरोग्य अधिकारी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत बदल करून कामकाजाची वेळ सकाळी ७ ते दुपारी बारा आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.३० अशी करण्यात आली आहे. तर मुख्य आरोग्य निरिक्षकाच्या कामकाजाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी ४ ऐवजी आता सकाळी ७ ते दुपारी ३ अशी करण्यात आली आहे.












