न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२४) :- व्हाट्सअप कॉलद्वारे ‘मी सीबीआय अधिकारी आहे’ अशी भीती घालत फिर्यादी डॉक्टरला ‘तुमच्या क्रेडीट कार्डवरून एक कोटीचे ट्रान्जेक्शन झालेले आहे. तुम्हाला सुप्रिम कोर्ट व ईडीने नोटीस नोटीस पाठवली, असे खोटे सांगत तुम्हाला अटक होणेपासुन वाचायचे असेल तर २०,०००,०० /- (वीस लाख रूपये) भरावे लागतील, अशी मागणी केली. फिर्यादीला २८,३५,००० रूपये (अठ्ठावीस लाख पस्तीस हजार) रूपये आरोपीने त्याच्या खात्यात टाकण्यास सांगत त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २८/११/२०२४) रोजी दुपारी १२/२० वा. सुमा ते (दि.२९/११/२०२४) रोजी १.०० वा. चे दरम्यान महावीर क्लीनिक, मोहननगर, चिंचवड येथे घडला.
याप्रकरणी डॉ. भारत कांतीलाल शहा (वय ७६ वर्षे, व्यवसाय. डॉक्टर, रा. चिंचवड) यांनी आरोपी रविकुमार व इतर एक इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी १०७५/२०२४ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि (गुन्हे) कापरे पुढील तपास करीत आहेत.












