न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२४) :- ट्रकमधून टाईल्स उतरविण्याचे काम सुरु होते. त्यावेळी ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालविल्यामुळे त्यातील काही टाईल्स उदय महामुनी यांच्या अंगावर पडल्या. त्यामुळे त्यांचा त्यात मृत्यू झाला.
हि घटना (दि.२१/१०/२०२४) रोजी दुपारी २.३० वा सुमा. तनिष टाईल्स, आदर्श चौक, पिंपरी चिंचवड शाळेजवळ विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
याप्रकरणी जयंत कमलाकर महामुनी (वय ४२ वर्षे व्यवसाय) यांनी आरोपी ट्रक चालक सोनुकुमार महेंद्र चौधरी (सध्या रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
काळेवाडी पोलिसांनी १२८१/२०२४ भा.न्या.सं. कलम १०६, २८१ एम.व्ही. अॅक्ट कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.











