- तू काय महाराज आहेस का? असेल तर तुझ्या घरात’..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२४) :- ‘तू काय महाराज आहेस का? असेल तर तुझ्या घरात, इथे गाडीत बसला आहेस, तर एक्स्ट्रा चार्जेस द्यावेच लागतील, असे म्हणून दमदाटी करत कीर्तनकाराला धक्काबुक्की केली आहे. तसेच त्यांना आर्टिका कार च्या दरवाजावर ढकलून दिले. यामुळे त्यांचे डोके आदळले. कारच्या दरवाजाचा वरचा कोपरा त्यांच्या डोळ्याला लागल्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या भुवईला गंभीर जखम झाली आहे.
हा प्रकार चिंचवड स्टेशन कडून मुंबईकडे जात असताना रावेत येथील पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यास वाहन थांबले असताना घडला. एसी चे पैसे देण्यावरून गुरुवारी सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान हा प्रकार घडला.
अविनाश दिगंबर कल्याणकर देशमुख (वय वर्ष २४) असे हल्ल्यात जखमी झालेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. ते आळंदी येथे राहण्यास आहेत.
याप्रकरणी सिराज जावेद इराणी (वय वर्ष ३५, रा. साईबाबा नगर झोपडपट्टी, चिंचवड) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे.
रावेत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोहवा गुळींग हे करीत आहेत.











