न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२४) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ”महापरिनिर्वान दिन” साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे रोहिणी साबळे, उर्मिला ठोंबरे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शन केले.
अरुण चाबुकस्वार म्हणाले, ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमपूज्य, बोधिसत्व, महामानव, युगपुरुष, घटनापती, महाविद्वान, दलितांचे कैवारी, स्त्री उद्धारक होते. माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो, असे बाबासाहेबांचे शब्द आहेत. ”
इयत्ता दहावीच्या लुबिनी माळगे, जगताप समृद्धी या विद्यार्थिनींनी भाषण केले व तसेच सहशिक्षिक पूजा देवगिरीकर, दिव्या सराफ, प्रज्ञा शिरोडकर यांनी आपले इंग्रजी मराठी-हिंदी मध्ये मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थि-विद्यार्थ्यांनीनीं पोवाडा गायला.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निशा पवार यांनी केले व आभार भावना देवरे यांनी मानले.












1 Comments
tlovertonet
Wonderful website. Plenty of helpful info here. I am sending it to some friends ans additionally sharing in delicious. And naturally, thank you to your effort!