न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२४) :- सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांमुळे पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातून कासारवाडी येथे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी वगळता इतर वाहनांना महापालिकेने प्रवेशबंदी लागू केली आहे.
प्रवेशबंदीचा तिथे फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे कासारवाडीच्या दिशेने जाणारी वाहतूक कल्पतरु सोसायटीमार्गे भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावर वळवण्यात आली आहे. परिणामी, कासारवाडीत जाणा-या नागरिकांना पुलावरुन वळसा घेऊन कासारवाडीत यावे लागत आहे.


















