- न्यायाधीशांकडून इमारतींची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२४) :- मोरवाडी येथे ५ न्यायालय फर्निचर सहित तयार आहेत. या ठिकाणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन व्हावे यासाठी पिंपरी चिंचवडमधील वकिलांनी वारंवार मागणी केली होती. न्यायालयांच्या प्रस्तावास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून सदरचा प्रस्ताव निधी अभावी शासन स्तरावर प्रलंबित आहे. परंतु सदरच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे तोपर्यंत इतर दोन न्यायालये पिंपरी, मोरवाडी येथे सुरू करण्यात येणार आहेत. नुकतीच प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन तसेच पिंपरी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश एम. जी. मोरे यांनी मोरवाडी येथील जुन्या न्यायालयाची पाहणी केली.
आकुर्डी येथील महापालिकेचे सुरू असलेले दिवाणी न्यायालाय मोरवाडी येथे स्तलंतरित करावे. जेणेकरून वकिलांना व पक्षकारांना जवळ जवळ दोन्ही न्यायालय होऊन त्रास कमी होईल, अशी मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असो.चे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी केली.
यावेळी पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील, ॲड. दिनकर बारणे, ॲड. गोरक्ष लोखंडे (महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग- सदस्य), ॲड. श्रीराम गालफाडे, ॲड. निलेश भिसडे, ॲड. चौरे, ॲड. प्रसन्न लोखंडे, टायपिस्ट संघटनेचे शुभम मचाले उपस्थित होते.











