- रुग्णालयात देखील आला मृताच्या टाळुवरच लोणी खाण्याचा प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 09 डिसेंबर 2024) :- सतरा सिटर टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीने चाकणकडे निघालेल्या दाम्पत्याच्या ज्युपिटर दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून फिर्यादीची ५४ वर्षीय पत्नी खाली पडली. पाठीमागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स वाहनाचे चाक फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्यावरून गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.फिर्यादी यांनाही जखम झाली आहे.
तत्पुर्वी उपचारासाठी महिलेला रुग्णवाहिकेमधून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी महिलेच्या गळ्यात सव्वा लाखांचे पाच तोळ्यांचे गंठण होते. तेही अज्ञाताने चोरुन नेले आहे.
हा प्रकार (दि.०७) रोजी दुपारी १.४० वा. मौजे वाकी खुर्द गावचे हद्दित शिवांशी पान शॉपचे समोर, नाशिक पुणे रोडवर चाकणकडे येत असताना व आस्था हॉस्पिटल येथून अॅम्ब्युलन्समधून ग्रामीण रूणालय चाकण येथे घडला.
याप्रकरणी वसंतराव भिकाजी गाडे (वय ६९ वर्षे, रा. येलवाडी) यांनी आरोपी १)१७ सिटर टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी नं. एम एच १२ केक्यू ०२९७ वरील चालक व २) अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद नोंदवली आहे.
चाकण पोलीसांनी ८९७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (a),१२५ (ड), १०६ (१),३२४(४) (५), ३०३ (२) मो वा का क१८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मोरे पुढील तपास करीत आहे.











