- म्हणाले. ‘संविधानाने दिलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेतूनच याच उत्तर आपल्याला द्यायचंय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२४) :- परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज परभणी बंदची हाक देण्यात आली.
या बंदला हिंसक वळण लागलं. परभणीत जाळपोळीची घटना घडली. त्यानंतर आ. अमित गोरखे यांनी आंबेडकरी अनुयायींना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून लोकशाही माणसाला माणसासारखं जगायला दिली, जनावरासारखं उन्माद करायला नव्हे. परभणीत डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची केलेली तोडफोड म्हणजे जातीयवादाचे टोक आहे. पण याचे उत्तर आपल्या संविधानाने दिलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेतूनच आपल्याला देणे आहे. समाजकंटकांनी तर आपल्या पवित्र संविधानाचा अपमान केलाय, तो आपल्याकडून होता कामा नये. प्रशासनाने देखील जलद गतीने हल्लेखोरांना शिक्षा करावी, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.


















