न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर वाल्हेकरवाडीतील स्वप्ननगरी सोसायटीत नवीन उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभाचे उद्घाटन प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील तसेच जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते डी डी पगार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सोसायटीतील जेष्ठ सदस्य पोपट भांडवे स्वप्ननगरी मित्र मंडळाचे पदाधिकारी, जेष्ठ महिला सदस्य हे उपस्थित होते.
याप्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” भारत देशाचे आद्य स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या राज्यनिर्मीतीच्या प्रारंभी भगवा ध्वज फडकावूनच परकीय शत्रूंचा बिमोड केला व राज्यात जनतेचे राज्य स्थापन केले. अश्या भगव्या झेंड्यास मानवंदना देण्यास तरुणाईने पुढाकार घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरात एकतेच्या संदेशाचा प्रारंभ झाला आहे”.
सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक डी डी पगार म्हणाले,” देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला नुकतेच ७५ वर्ष झाले. या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या सोसायटीत ध्वज स्तंभ उभारला गेल्याने परिसरातील सर्व सदस्य राष्ट्रध्वज फडकावुन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतील. २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकावून व ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा आंनदोउत्सव साजरा केला जाईल.”
या उपक्रमास मदत केलेले जयंत कुरकुरे व सिद्धूकाका खोले यांचेही स्वप्ननगरी मित्र मंडळाच्या वतीने आभार मानन्यात आले.


















