न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन पक्षाचे राष्ट्रीय संघटक, राज्यसभा खासदार संदीप फाटक यांचे हस्ते संपन्न झाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पक्षाला नवी उभारी देण्यासाठी रविराज काळे यांनी नुकतीच दिल्ली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. पक्ष विस्तार आणि संघटनात्मक विषयांवर त्यांनी चर्चा केली. रविराज काळे यांनी आपल्या कार्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सादर केला. तसेच नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजित फाटके, अभिजीत मोरे, मुकुंद किर्दत, युवक प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर, अमित मस्के यासह राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











