- सचिन साठे फाउंडेशनच्या वतीने पिंपळे निलखमध्ये आठवडे बाजार सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने विशाल नगर, पिंपळे निलख येथे सुरू केलेला आठवडे बाजार हा एक स्तुत्य उपक्रम आहे. येथे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे नागरिकांच्या सुविधे साठी प्रशस्त पार्किंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाजगी जागेत आठवडे बाजार भरणारा हा शहरातील पहिलाच प्रयोग आहे. याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार तथा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
आठवडे बाजारचे आयोजक सचिन साठे यांनी सांगितले की, स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ पिंपळे निलख, विशालनगर, हॉटेल रंगीला पंजाब शेजारील जागेत शेतकरी राजा कष्टकरी संघटनेचे नवनाथ गरुड आणि त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी जुन्नर, लोणी काळभोर, शिरूर येथील शेतकऱ्यांचे सेंद्रिय शेती उत्पादनाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. येथे स्वच्छ, ताजा भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दर शुक्रवारी या ठिकाणी दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत विक्री सुविधा आहे. या परिसरात वाढलेल्या सोसायटीतील नागरिकांना कमीत कमी अंतरावर खरेदीचा लाभ घेता येईल. प्रशस्त पार्किंग उपलब्ध करून दिल्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा होणार नाही.
यावेळी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वृषालीताई मरळ, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन भुजबळ, काळूराम महाराज इंगवले, काळूशेठ नांदगुडे, विजय जगताप, बाळासाहेब जगताप, नितीन इंगवले, अनंत कुंभार, अशोक बालवडकर, अनिल संचेती, शिवाजी दळवी आदींसह शेकडो ग्राहक उपस्थित होते.

















2 Comments
Aldo Calais
Hey very cool site!! Man .. Excellent .. Amazing .. I will bookmark your blog and take the feeds also…I am happy to find so many useful information here in the post, we need develop more techniques in this regard, thanks for sharing. . . . . .
Free Champions League Streams
Adorei este site. Pra saber mais detalhes acesse o site e descubra mais. Todas as informações contidas são conteúdos relevantes e exclusivos. Tudo que você precisa saber está ta lá.