- देहूरोडच्या दोन घड्याळ व्यवसायिकांवर पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. १६ डिसेंबर २०२४) :- फास्ट्रॅक कंपनीच्या चारशे बनावट घड्याळांची विक्री आणि त्याची वाहतूक करीत दोघा व्यवसायिकांनी केली. तसेच ते इतरही बनावट वस्तूंची विक्री करीत होते. या बनावट घड्याळांची किंमत अंदाजे चार लाखांच्या आसपास आहे.
हा प्रकार रविवार (दि. १५) रोजी पावणे एकच्या सुमारास देहूरोड येथील अमरजाई मंदिर आणि देहूरोड येथील डायमंड नावाच्या घड्याळाच्या दुकानात घडला आहे.
याप्रकरणी कंपनीचे तपासी अधिकारी गौरव शाम नारायण तिवारी यांनी आरोपी काशिनाथ उर्फ प्रभाकर चव्हाण (घड्याळ विक्री व्यवसायिक, रा. देहूरोड) तसेच विनोद लीलाचंद जैन (डायमंड वॉच दुकान, देहूरोड) यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
देहूरोड पोलिसांनी पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्ट नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहवा विधाते करीत आहेत.











