- काळेवाडीतील श्रीकृष्ण कॉलनीत तरुणावर ब्लेडने वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२४) :- मित्राच्या भांडणात मागे मध्यस्थी करून ते भांडण सोडविले होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या मित्राच्या कानफटात मारली होती. त्याचा राग मनात धरून त्यांचा आरोपी मित्र व आणखी एकाने फिर्यादीला घराच्या बाहेर बोलून घेतले.
‘तुला लय माज आलाय काय? तू माझ्या कानफाडीत का मारलीस, तुला सोडत नाही, तुझे विकेट टाकतो’ असे म्हणत दोघांनी फिर्यादीला हाताने तसेच ब्लेडने डोक्यात, गालावर, मनगटावर वार करून त्यांना दुखापत केली आहे.
हा प्रकार रविवारी (दि. १५) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर श्रीकृष्ण कॉलनी, कोकणेनगर, काळेवाडी येथे घडला. या प्रकरणी प्रशांत नागेश जाधव (रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी आरोपी सागर शिंदे (वय वर्ष २२, रा. प्रेमलोक कॉलनी, राजवाडेनगर, काळेवाडी) तसेच आरोपी क्रमांक दोन चेतन उर्फ सुजल कोरे (वय अंदाजे वीस वर्षे, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे. याप्रकरणी वाकड / काळेवाडी पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून सपोनी गुरव हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.
















