न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २० डिसेंबर २०२४) :- ‘तू माझ्याशी कधी लग्न करणार’? असे विचारताच ‘मी तुझ्याशी लग्न करणार नाही’ असे म्हणत आरोपी तरुणाने तरुणीला लोखंडी हैमरने हातावर व डोक्याला मारहाण केली. तरुणीच्या जुपिटर गाडीचेही नुकसान केले.
हा प्रकार (दि.१८) रोजी सायंकाळी ४.०० वाजता रुद्राक्ष हॉटेल समोर, मार्केट यार्ड चौक, चाकण येथे घडला. महीला फिर्यादीने आरोपी अभिषेक हेमंत लेडघर (वय २४ वर्ष रा. राणुबाईमळा, चाकण) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चाकण पोलिसांनी ९२८/२०२४ भा न्या सहीता ११८ (१),३२४(४) (५),११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा रेंगडे पुढील तपास करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.











