न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२४) :- लग्न कार्यासाठी रजेवर गेलेला कैदी सचिन संजय गिरी पाच महिन्यांपासून पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार सुभाष इंगळे यांनी फिर्याद दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ते नेमणुकीस आहेत. या कारागृहात सचिन गिरी सजा भोगत होता. लग्न कार्यासाठी त्याला रजा मंजूर होती. त्यानुसार प्रवासासह १८ जुलै रोजी चार दिवसांच्या रजेवर त्याला सोडले होते.
त्यानंतर त्याने आणखी चार दिवस म्हणजे २५ जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली होती. तीही मंजूर होती. अद्यापपर्यंत तो कारागृहात हजर झालेला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











