न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २१ डिसेंबर २०२४) :- मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे. यांच्या आदेशाने पोलिसांच्या मदतीने एल एण्ड टी फायनान्सच्या प्राधिकृत अधिकारी यांनी रो हाऊसचा ताबा घेतला होता. त्यांच्या ताब्यात असलेल्या मिळकतीच्या सुरक्षेसाठी सिक्युरीटी गार्डची पहाऱ्यासाठी त्यांनी नेमणूक करण्यात आली होती.
दरम्यान तिथे आलेल्या चौघांनी त्याला धमकी देवुन मिळकतीचे कुलूप तोडुन अनधिकृतपणे बळजबरी करुन ताबा घेतल्याचा प्रकार (दि.१९) रोजी सायंकाळी ७.३० वा. दापोडी येथे घडला.
याप्रकरणी अनिकेत कड यांनी आरोपी १) बुन्दाराम जोधाराम चौधरी, २) महिला आरोपी, ३) अनिल बुन्दाराम चौधरी, ४) अनिल चौधरी याची पत्नी (सर्व रा. दापोडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी (दापोडी) पोलिसांनी ८०८/२०२४ भा.न्या.सं. कलम ३२९ (३), ३३३,३५२, ३५१(२) (३), ३(५) प्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि महाजन पुढील तपास करीत आहेत.











