- तब्बल अठरा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २१ डिसेंबर २०२४) :- तळवडे मोशी-देहु रोडलगत तळवडे चौकात पत्र्याच्या मोकळया शेडमध्ये विकी क्षिरसागर याच्या सांगण्यावरून जुगार सुरु होता. पोलिसांनी (दि.१९) रोजी सायंकाळी ७.०० वा सुमारास कारवाई केली.
एकुण ६१,३१० रुपये रोख रक्कम, मटका जुगाराचे आकडे लिहलेले पुस्तके व कागदे, ०४ बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवडचे पोलीस हवा नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आरोपी १. दिपक शिवाजी गायकवाड, २. सोनेराव कुडलिक कांबळे, ३. रमजान महमंद शेख, ४. अनिल छगन अंक्कर, ५. पितांबर श्यामराव लोढ़े ६. रवि रामचंद्र राठोड, ७. संपत ज्ञानेश्वर येळवंडे, ८. यश अतुल कदम, ९. प्रविण लक्ष्मण गायकवाड, १० अरुण नानासाहेब बेडके, ११. विवेकांनद काशिनाथ शिंदे, १२. गणेश बाबासाहेब गहाळ, १३ वाघवंर ज्ञानोबा कांबळे, १४ मंजय चनबस तावसकर, १५ अनिल बळीराम वेताळ, १६ विकास शिवाजी लष्करे, १७. अरुण रामचंद्र कावळे, १८. नामदेव महादेव दळवी यांच्या विरोधात देहूरोड पोलिसांनी ५५७/२०२४, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा /११०३ क्षिरसागर पुढील तपास करीत आहेत.
















