- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२४) :- विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपने आता स्वराज्य संस्थांच्या स्थानिक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या पावणेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यांत घेण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
नवनियुक्त मंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर येत्या चार जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. मुख्य म्हणजे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी काही महिन्यांपासून या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
फडणवीस म्हणाले, विधानसभेला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्याचे वातावरण भाजपसाठी अत्यंत अनुकूल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठा विजय मिळवण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा विजय मिळवायचा असेल तर सदस्यत्व नोंदणीवर भर द्यावाच लागेल, असेही ते म्हणाले.
प्रभाग रचना, किती नगरसेवकांचा प्रभाग, राखीव जागांसाठीच्या जनगणनेचा अभाव यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर खुद्द न्यायालयानेही जनगणनेबाबत आकडेवारीच नाही, तर मग राखीव प्रभाग निश्चित कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा अनेक कारणांनी राज्यात केवळ महानगरपालिकाच नव्हे तर नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती यांच्या निवडणुका मागील पावणेतीन वर्षांपासून रखडल्या आहेत.
‘या’ महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित
पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, छ. संभाजीनगर, नदिड, लातूर, परभणी.
‘या’ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा.
















3 Comments
tlover tonet
You really make it appear so easy along with your presentation however I to find this topic to be really one thing which I feel I might never understand. It seems too complicated and extremely large for me. I am looking forward in your next submit, I¦ll try to get the hold of it!
NFLStream Online
I think other website proprietors should take this website as an model, very clean and magnificent user genial style and design, let alone the content. You’re an expert in this topic!
Watch free IndyCar Series streams
me encantei com este site. Pra saber mais detalhes acesse o site e descubra mais. Todas as informações contidas são informações relevantes e exclusivos. Tudo que você precisa saber está ta lá.