न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे/ पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२४) :- पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडली आहे. फूटपाथवर हा डंपर गेला आणि झोपलेल्या ९ जणांना चिरडले. जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. मृत्तांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री कामगार कामासाठी अमरावती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने १२ जण फुटपाथवर झोपले होते. तर काही जण फुटपाथच्या बाजूला झोपले होते. मध्यरात्री साधारण १२.३० च्या सुमारस डंपर वेगात आला आणि फुटपाथवर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला. यात तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई कारण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेत विशाल विनोद पवार (वय २२ वर्ष), वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय ३ वर्ष) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जानकी दिनेश पवार (२१), रिनिशा विनोद पवार (१८), रोशन शशादू भोसले (९), नगेश निवृत्ती पवार (२७), दर्शन संजय वैराळ (१८) आलिशा विनोद पवार (४७) अशी या ६ जणांची नावे आहेत. या दुर्घटनेतील जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे. हे सर्वजण मूळ अमरावतीत राहणारे आहेत. या घटनेनंतर आरोपी डंपर चालक याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करण्यात आली आहे.















2 Comments
Toney Fagerquist
I went over this internet site and I believe you have a lot of great information, saved to my bookmarks (:.
Watch Basketball Online
It’s the best time to make a few plans for the future and it’s time to be happy. I’ve learn this post and if I may I want to suggest you some fascinating things or tips. Perhaps you could write next articles relating to this article. I desire to learn more things approximately it!