न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२४) :- महिलेस मारहाण करून, जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे. (दि. १९) रोजी सांगवी पोलीस ठाणे हद्दीत एक महिला ट्युशन घेण्याकरीता लिफ्ट मधुन जात असताना अचानक त्यांच्या मागुन एक अनोळखी इसम लिफ्ट येवुन, त्याने सदर महिलेच्या डोक्यात हत्याराने मारून, महिलेस जखमी करून, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरी करून नेमली होती.
याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. पिंपरी चिंचवड पोलीसांचे युनिट ४, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुंडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने गुन्हयाचा समांतर तपास करीत गुन्हयातील आरोपीचा शोध घेतला.
घटनास्थळावरील व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची सतत तीन दिवस रात्र तपासणी केली. सीसीटिव्ही मध्ये संशयीत इसम बनावट नंबर प्लेट वापरलेल्या मोटार सायकल वरून पळुन जाताना दिसुन आला. त्यावर सदर संशयीत इसम ज्या मार्गाने आला व पळुन गेला त्या मार्गाचा तांत्रिक विश्लेषाद्वारे तपास करून, तसेच संशयीत इसमाने वापरलेल्या वाहनाबाबत सखोल चौकशी करून संशयीत इसमांस निष्पन्न करण्यात आले.
संशयीत आरोपीचा वरील पथक शोध घेत असताना मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी ईश्वर कैलास वाल्हेकर, (वय ३४ वर्षे, रा. बिल्डींग नंबर १५ चे मागे, बौध्दनगर, एम.आय.डी.सी. पिंपरी, पुणे) यास दिनांक २२/१२/२०२४ रोजी ताब्यात घेवुन, प्राप्त सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाद्वारे केलेल्या तपासाच्या आधारे नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे.















1 Comments
Alma Gollihue
I am often to blogging and i really appreciate your content. The article has really peaks my interest. I am going to bookmark your site and keep checking for new information.