न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२४) :- भरधाव वेगातील टेम्पोचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर उलटला. ही घटना सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथील बैलजोडी चौकात घडली. अपघातात चालक थोडक्यात बचावले असून गाडीचे मोठे नुकसान झाले.
शिरगावहून सोमाटणेच्या दिशेने वेगात येत असलेला सिमेंट विटांनी भरलेला टेम्पो (एमएच-४२, बीएफ- ९२७७) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला खांबाला धडकला. त्यानंतर पुढे चौधरी हार्डवेअर या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर पलटी झाला.
दीपक कुमार (४०) असे टेम्पोचालकाचे नाव आहे. तर शैलेंद्र सिंग (५८, रा. भांगरवाडी, लोणावळा) असे अपघातात जखमी झालेल्या कार चालकाचे नाव आहे. येथील दुकानचालक जीवन चौधरी आणि ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून शैलेंद्र सिंग यांना गाडीची काच फोडून बाहेर काढल्याने ते थोडक्यात बचावले. तळेगाव दाभाडे पोलिस अधिक तपास करत आहेत.
















2 Comments
Ofelia Meszaros
Your place is valueble for me. Thanks!…
Live Soccer Matches Streaming
Howdy would you mind stating which blog platform you’re using? I’m planning to start my own blog in the near future but I’m having a difficult time choosing between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal. The reason I ask is because your design seems different then most blogs and I’m looking for something completely unique. P.S Apologies for getting off-topic but I had to ask!