न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२४) :- काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तोंडी सर्रासपणे शिव्या ऐकू येतात. आई-बहीण, स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अशा शिव्यांच्या वापरास पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका आणि खासगी शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. शिव्यामुक्त समाजासाठी शपथ घेण्याच्या सूचना सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.
एकीकडे मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा केला जातो. लाडकी बहीण योजना राबविली जाते. भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात येतात. मात्र, दुसरीकडे आई व बहिणीवरुन अपशब्दांचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे सामाजिक व नैतिक मूल्ये पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे शाळांमध्ये शिवी देण्यावर बंदी आणली आहे.
महापालिका व खासगी शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना राज्य शासनाने पत्र पाठविले आहे. शिव्या देण्यास शाळेत बंदी घालण्यात यावी. विद्यार्थ्यांमध्ये शपथ घेवून त्यांना स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी, समृध्द व संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि सभ्य, सुसंस्कृत व अभिरुची समाज निर्मितीसाठी भारतीय संविधानच्या तरतूदीचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बागर यांनी सांगितले.












1 Comments
tlover tonet
You are my aspiration, I have few web logs and sometimes run out from to post : (.