न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २५ डिसेंबर २०२४) :- पत्नीला कानशिलात मारल्याने ती खाली पडली व तिच्या डोक्याला मार लागला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. ही घटना १६ डिसेंबर रोजी भोसरीतील आळंदी रोड येथे घडली.
खुशबू राजकरण हरीजन (वय २८, रा. जयभीम पार्क, आळंदी रोड, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिस हवालदार सचिन दत्तात्रय गोगावले यांनी सोमवारी (दि. २३) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी राजकरण गणेशप्रसाद साकेत (२५) याला अटक केली आहे.
राजकरण याचे पत्नी खशबू हिच्यासोबत १६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास भांडण झाले. रागाच्या भरात त्याने पत्नीला कानशीलात मारली. त्यामुळे ती खाली पडून तिच्या डोक्याच्या मागील बाजूला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दखल केले.












1 Comments
Chester Reagen
My brother recommended I might like this web site. He was entirely right. This post truly made my day. You can not imagine just how much time I had spent for this info! Thanks!