न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२४) :- बिना इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने नुकतीच शालेय जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
शरनपाल कौर, जितू कटारिया भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष पाशा आत्तार, रविराज गाढवे सचिव पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंग, गणेश मांढरे, अभिषेक शिंदे, प्रियंका अचमट्टी, कारभारी गायकवाड, किरण माने, बॉक्सिंग कोच जितू कटारिया, क्रीडा संघटक सुनील साठे आदींनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेत पिंपळे गुरव येथील सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते या विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कांबळे, वैशाली दिंडाळ, प्रायमरी मुख्याध्यापिका माया बायस, सेक्रेटरी राजेश मनाकांत, क्रीडा शिक्षक सुनील साठे उपस्थित होते.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील साठे यांचे मार्गदर्शन लाभले
या स्पर्धेत आर्यन भारती गोल्ड मेडल, साहिल शिंदे गोल्ड मेडल, आकाश कांबळे गोल्ड मेडल, इशप्रित कटारिया गोल्ड मेडल, प्रवीण पटेल ब्रांज मॅडल, रणवीर कटारिया ब्रांज मॅडल या खेळाडूंनी चमकदार कामगीरी केली.











2 Comments
tlovertonet
I believe this web site has some very great information for everyone :D. “Heat cannot be separated from fire, or beauty from The Eternal.” by Alighieri Dante.
Watch Motorsports Online
Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.