- नगरपंचायतीकडून नागरिकांकडून आवाहन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २५ डिसेंबर २०२४) :- देहूगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विना परवाना अनधिकृतपणे रेखांकन करण्यात आले आहे. यापैकी अनेक गट हे शेती विभागातील असून अनेक गटांमधील क्षेत्र हे अॅम्युनेशन डेपोच्या प्रतिबंधित (रेड झोनबाधित) क्षेत्राने बाधित होत आहेत. अशा विनापरवाना अनधिकृत रेखांकन केलेल्या रेडझोन बाधित क्षेत्रातील भूखंड खरेदी करू नयेत, असे आवाहन देहू नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
हे अनधिकृत भूखंड व त्यावरील बांधकामे यावर भविष्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२. ५३ व ५४ तसेच इतर विद्यमान कलम व कायद्यानुसार अनाधिकृत इमारती निष्कासित करण्याची कारवाई होऊ शकते. अनधिकृत लेआऊट यांची गटनिहाय यादी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे देहु नगरपंचायततर्फे सादर करण्यात आली आहे. या गटामधील भूखंडाची खरेदी व्यवहार कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. असे रेडझोन बाधित क्षेत्रातील भूखंड खरेदी करू नयेत.
नागरिकांनी अनधिकृत भूखंत खरेदी करू नयेत, अनधिकृत भुखंडावर बांधकामे करू नयेत, अशा अनधिकृत रेखांकनात निर्माण करण्यात येणाऱ्या बांधकामांना नियमानुसार आवश्यक असणारे रस्ते, ड्रेनेज, सांडपाण्याचे नियोजन करणे, पिण्याचे पाणी, पथदिवे अशा सुविधा नगरपंचायतीकडून पुरवल्या जाणार नाहीत, अशी माहिती देहू नगरपंचायतीने दिली आहे.
गटामध्ये झालेल्या अनधिकृत प्लॉटिंगमधील भूखंड खरेदी करू नये. त्याचे कुलमुख्यत्यार पत्र किंवा विकसन करारनामा करून ताब्यात घेऊ नये. देहू नगरपंचायत मार्फत दिलेला बांधकाम परवाना, भोगवटा परवाना, अंतिम लेआऊट, तपासल्या शिवाय विनापरवाना मालमत्ता/भूखंडाची खरेदी करू नये. अनधिकृत रेखांकनातील भूखंड शेती प्लॉटचे विकास परवाना मालमत्ता व भूखंडाची खरेदी करू नये, असे आवाहन देहु
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता मार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे आणि उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण यांनी केले आहे.












1 Comments
Lauren Platzer
Good info and right to the point. I don’t know if this is actually the best place to ask but do you folks have any thoughts on where to hire some professional writers? Thank you 🙂